एंजल वन लिमिटेड, ही कंपनी पूर्वी एंजल ब्रोकिंग लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. 1996 मध्ये स्थापन झालेली ही भारतीय स्टॉक ब्रोकर फर्म आहे. कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज लिमिटेड आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची सदस्य आहे. हे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL)सह डिपॉझिटरी सहभागी आहे. कंपनीचे भारतातील 900 हून अधिक शहरांमध्ये 8500 हून अधिक सब-ब्रोकर आणि फ्रँचायझी आउटलेट आहेत.
कंपनीच्या सेवांमध्ये ऑनलाइन स्टॉक ब्रोकिंग, डिपॉझिटरी सेवा, कमोडिटी ट्रेडिंग आणि गुंतवणूक सल्लागार सेवांचा समावेश आहे. या कंपनीकडून वैयक्तिक कर्ज आणि विमाही दिला जातो. 2006 मध्ये एंजेल ब्रोकिंगने पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा, IPO व्यवसाय आणि म्युच्युअल फंड वितरण शाखादेखील सुरू केली.
एंजल ब्रोकिंग 8 ऑगस्ट 1996 रोजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून समाविष्ट करण्यात आली. नंतर एंजल ब्रोकिंग डिसेंबर 1997 मध्ये वेल्थ मॅनेजमेंट, रिटेल आणि कॉर्पोरेट ब्रोकिंग फर्म म्हणून समाविष्ट करण्यात आली. नोव्हेंबर 1998 मध्ये एंजेल कॅपिटल आणि डेट मार्केट्स लिमिटेडने कायदेशीर संस्था म्हणून राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजचे सदस्यत्व प्राप्त केले. कंपनीने एप्रिल 2004 मध्ये कमोडिटी ब्रोकिंग विभाग उघडला.
एंजेल वनकडे ऑनलाइन ट्रेडिंगसाठी एंजेल स्पार्क, एंजेल बीईई म्युच्युअल फंड अॅप, एंजेल स्पीडप्रो, एंजेल ट्रेड आणि एंजल स्विफ्टसारखी उत्पादने आहेत. तसेच एंजेल आय हा ब्राउझर ट्रेडिंग ऍप्लिकेशन आहे; SpeedPro एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशन आहे; एंजेल ट्रेड स्टॉक गुंतवणूकदारांसाठी ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रदान करते. त्याचबरोबर त्यांचे स्विफ्ट हे लहान साधनांसाठी ट्रेडिंग अॅप आहे.