संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

भारत सरकारने आम्हाला एअरलिफ्ट करावं, युक्रेनमधील मराठी विद्यार्थ्यांची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची ठिणगी पेटली असताना, स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन सैन्याने युक्रेनच्या अनेक भागांवर बॉम्बहल्ले केले आहेत. त्याचवेळी युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतातील अनेक विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. विद्यार्थ्यांनी मदतीसाठी भारत सरकारकडे याचना केली आहे.

दरम्यान, युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत असलेल्या नागपूरच्या पवन मेश्राम या विद्यार्थ्याने बीबीसी मराठीला एक व्हीडिओ पाठवून तिथल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. माजेपी स्ट्रीटवर खूप सारे बंकर तयार करण्यात आले होते. त्याठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. संपूर्ण इव्हानोमध्ये हायड्रोलेटिक पाईप, जिथून वीजेचा, पाण्याचा पुरवठा होत होता, त्याचठिकाणी हल्ला केला आहे. गावं आणि शहरांमध्ये वीज, पाणी याचा तुटवडा यावा म्हणून हा हल्ला करण्यात आला अशी माहिती पवन मेश्रामने वृत्तसंस्थेला दिली आहे. सगळीकडं आणीबाणी निर्माण झाली आहे. बाहेर सगळीकडं धूर दिसत आहे. भारत सरकारनं येथील लोकांना एअरलिफ्ट करावं अशी आमची विनंती असल्याचेच त्याचे म्हणणे आहे. कारण सगळ्या फ्लाईट बंद झाल्या आहेत, इथं नो फ्लाइट झोन झालं आहे, त्यामुळं सरकारला आमची विनंती आहे, की त्यांनी आमची मदत करावी, अशी मागणी त्याने सरकारकडे केली आहे.

दरम्यान, भारतीय दूतावासाने २० तारखेला आम्हाला युक्रेन सोडण्यासंदर्भात सूचना केली असल्याचे त्याने सांगितले. मात्र भारतात जाण्यासाठी एअर इंडियाची विमानं २२, २४ आणि २६ तारखेला उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तिकीट प्रत्येकाने आपापलं काढायचं आहे. एरव्ही किव ते दिल्ली या प्रवासासाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. मात्र, “एअर इंडियाचं विमानाचं तिकीट ६० ते ८० हजार रुपये आहे. आम्ही तिकीट काढू पण त्याचे दर थोडे कमी झाले तर बरं होईल अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. आमचे लेक्चर्स ऑनलाईन सुरू झाले आहेत. मायदेशी परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तिकिटाचे दर कमी झाले तर चांगलंच आहे. नाहीतर आम्हाला तिकीट ज्या किमतीला उपलब्ध असेल ते घेऊन परतावं लागेल,” असे पवनने सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami