मुंबई -महाराष्ट्रातील सत्तांतराचे पडसाद आता संसदीय लोकप्रतिनिधींमध्येही उमटायला लागले आहेत.शिवसेनेच्या लोकसभेतील प्रतोद भावना गवळी याना प्रतोदपदावरून हटवावे, आणि त्या जागी शिवसेना खासदार राजन विचारे यांची प्रतोदपदी नियुक्ती करावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी याना लिहलेल्या पत्रात, भावना गवळी याना सेनेच्या लोकसभेतील प्रतोद पदावरून हटवण्याची विनंती केली आहे. मात्र या बाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून, संसदेपर्यंत शिवसेनेत बदल घडायला सुरुवात झाली आहे. भावना गवळी या शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार आहेत आणि शिंदे यांच्या बंडानंतर बंडखोरांवर कारवाई करू नका. अशी मागणी त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे त्या शिंदे गटाच्या मार्गावर आहेत असा संशय होता . आणि त्यामुळेच त्यांना प्रतोद पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला . त्यामुळे शिवसेनेच्या पत्रावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.१७ कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी भावना गवळी या ईडीच्या रडारवर असून त्यांना ईडी कडून चौकशीसाठी अनेक वेळा समन्स पाठवण्यात आले होते.