सिंधुदुर्ग- भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अवमानास्पद,शिवराळ आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भास्कर जाधव यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कुडाळ पोलिसांनी ही नोटीस बजावली असून भाजपा कार्यकर्त्यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
कुडाळच्या एका मोर्चामध्ये भास्कर जाधव यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात भास्कर जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत कुडाळ पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या घरी जावून नोटीस बजावलीआहे.दरम्यान, भास्कर जाधव यांनी राणे यांना डिवचणारे आणखी एक वक्तव्य केले आहे.एका २५ पैशांच्या नाण्यावर भाजपा नेते नारायण राणे यांचा फोटो लावल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.तसेच हे फायनल करा अशी मागणीही या मीमद्वारे करण्यात आली होती. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते भास्कर जाधव यांनीही हे नाणे एडिट करणाऱ्याचे कौतुक केले आहे.