पुणे- पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवणच्या स्वामी चिंचोलीजवळ भरधाव कार पलटल्याने 2 तरुण ठार तर 3 जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. हा अपघाताचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्याला सुरुवात केली.
वैभव विठ्ठल जांभळे (24) व प्रतीक पप्पू गवळी (22) अशी मृत तरुणांची नावे आहेत. असिफ बशीर खान ( 22), सुरज राजू शेळके (23) आणि ऋषिकेश बाळासाहेब येळे (22) हे तिघे जखमी झाले. हे पाच तरूण भिगवणकडून पुण्याकडे कारमधून निघाले होते. त्यांची गाडी स्वामी चिंचोली हद्दीत हॉटेल पंचरत्नजवळ आल्यानंतर गाडी अतिवेगात असल्याने कारने चार ते पाच वेळा पलटी घेतली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले.