संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

भीमाशंकरमध्ये बसला आग २९ प्रवासी सुदैवाने बचावले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – कल्याण इथून २९ प्रवाशांना घेऊन भीमाशंकरकडे निघालेल्या खासगी बसला आज सकाळी ७ च्या सुमारास भीमाशंकर रोडवरील शिंदेवाडीत भीषण आग लागली. मात्र स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे २९ प्रवासी सुदैवाने बचावले.
काही दिवसांपूर्वीच नाशिकजवळ खासगी बस आणि ट्रकची टक्कर होऊन अपघात झाला. त्यात बसला भीषण आग लागली. त्यात अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज सकाळी ७ वाजता भीमाशंकरला निघालेल्या खासगी बसला शिंदेवाडीत आग लागली. याची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले. आगीत बस जळून खाक झाली. प्रवाशांचे सामानही जळाले. मात्र सर्व प्रवासी सुखरूप वाचले. यामुळे खासगी बसच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami