संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

भीमाशंकर, घोडगंगासह शंभरसंस्थांच्या निवडणुका लांबणीवर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई -भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, पुणे कंन्टोन्मेंट सहकारी बँक आणि जिल्ह्यातील सुमारे १०० सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती सहकार विभागाने शुक्रवारी रात्री दिली. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी १७ जुलैला मतदान होणार होते. शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख सोमवार १८ जुलै होती. पुणे कंन्टोन्मेंट सहकारी बँकेची निवडणूक १७ जुलैला होणार होती. मात्र राज्य सरकारने या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्या ३० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकल्या आहेत. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे हा निर्णय घेतला असल्याचे सरकारने म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास १०० सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami