संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवार 23-24 फेब्रुवारीला देणार साक्ष

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भीमा-कोरगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणार्‍या आयोगासमोर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेेसर्वा शरद पवार हजर राहणार आहेत. 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहणार आहेत. 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आयोगाचे कामकाज पुण्याऐवजी मुंबईत होणार आहे. चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन पुणे पोलीस अधीक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे.

1 जानेवारी 2018 रोजी पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. या चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे आहेत. शरद पवार यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचे विधान केले होते. त्यानंतर या प्रकरणात अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता चौकशी आयोगाने शरद पवारांची साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना बोलावले आहे. दरम्यान, यापूर्वीही आयोगाने शरद पवारांना 4 एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, काही कारणास्तव ते हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे त्यांना आता पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami