संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

भुजबळांनी शिवसेना सोडली हा मानसिकधक्का! उद्धव ठाकरे यांचे विधान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई :-राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.उद्धव ठाकरे म्हणाले की, भुजबळांनी शिवसेना सोडली हा आमच्यासाठी सर्वात मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे आम्हाला सावरायला खूप वेळ लागला. एक चांगली गोष्ट भुजबळांनी केली ती म्हणजे बाळासाहेब असतानाच त्यांनी हे मतभेद मिटवले. त्यावेळी मॉं असत्या तर अजून चांगले झाले असते. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते या आधीच मुख्यमंत्री झाले असते. उद्धव ठाकरे पुढे म्हणतात की, शिवसेना धक्काप्रुफ झाली आहे. रोज आम्हाला धक्के बसतात, पण आम्ही त्याला तोंड देतोय. मी आता मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसे मिळणार नाही यावर लक्ष देण्यापेक्षा एकत्र या मैदानात, आम्ही तयार आहोत असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिलं आहे.

शिवसेनेने आतापर्यंत अनेक वादळे अंगावर घेतली, मात्र आता शरद पवार आमच्यासोबत आहेत, जे वादळे निर्माण करतात असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आज प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागते, हिंमत असेल तर मैदानात या, आम्ही तयार आहोत, होऊन जाऊ दे काय ते असे आव्हान त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिले. शिवसेनेचा जन्मच लढण्यासाठी झाला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami