मुंबई – खरे तर मुंबईकरांसाठी लोकल ही श्वास आहे.हा श्वास जेव्हा थांबतो तेव्हा मुंबई थांबते. कोरोना महासंकटात लॉकडाऊनमध्ये लोकल बंद केली होती.तेव्हा जणू काही मुंबईने श्वासच घेणे सोडले होते असे जाणवत होते. आता मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुखकर व्हावा, यासाठी पुणेपाठोपाठ आता मुंबईकरांना भुयारी मेट्रोचा आनंद लुटता येणार आहे. कारण मेट्रो-३ च्या भुयारी मार्गावरील सिद्धिविनायक स्थानकाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
मेट्रो -३ या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ३३.५ किमी भुयारी मार्गावर दादर स्थानकाशिवाय सिद्धिविनायक,काळबादेवी,चर्चगेट आणि हुतात्मा चौक हे स्टेशन असणार आहे. सिद्धिविनायक स्थानकाचे काम ८५ टक्के झाले आहेत. या मेट्रोमुळे उत्तर मुंबई गाठण्यासाठी मुंबईकरांना मोठी मदत होणार आहे. दादर स्थानकाचे काम प्रगतिपथावर असून ट्रॅकचे काम १०० टक्के झाले आहे. पण मेट्रो-३ च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईकरांना या मेट्रोने प्रवास करता येणार आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ या ३३.५ किमीच्या भुयारी मार्गाची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.