अमरनाथ – कोरोनाच्या उद्रेकानंतर 2 वर्षांनी आज अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून समुद्रसपाटीपासून 3,888 मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेकडे जाण्यासाठी भाविकांची पहिली तुकडी आज सकाळी ‘बम-बम भोले’च्या जयघोषात रवाना झाली. या यात्रेसाठी प्रशासनाने सीआरपीएफचे 2 लाख जवान तैनात
केले आहेत.
अमरनाथ यात्रेसाठी रवाना झालेल्या पहिल्या तुकडीला आज सकाळी कडेकोट बंदोबस्तात जम्मू बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. या यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना उद्या गुरुवारी हिमलिंगाचे पहिले दर्शन होणार आहे. तसेच नुनवान आणि बालटाल यात्रेच्या मार्गावरूनही भाविकांना रवाना केले जाणार आहे. प्रशासनाकडून यावर्षी वैद्यकीय सुविधांवर अधिकचे लक्ष केंद्रित केले गेले आहे. 2018 मध्ये आरोग्याच्या कारणांमुळे 100 हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे.