संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

मंकीपॉक्सच्या धोक्यांबाबत केंद्राच्या गाईडलाईन्स जारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – जगात मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता भारत सरकार सावध झालं आहे. गुरुवारीच केंद्र सरकारने राज्यांना मंकीपॉक्सबाबत इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी गुरुवारी सांगितले की, रुग्णाचे नमुने गोळा करण्यात आले असून ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार, मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा संसर्गजन्य रोग आहे आणि त्याची लक्षणे कांजन्याच्या रुग्णांसारखीच असतात.परदेशातून येणार्‍या लोकांवर सतत मांकीपॉक्ससाठी लक्ष ठेवले जाते आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशपासून केरळपर्यंत काही लोकांमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे दिसून आली होती. मात्र सुदैवाने भारतात अद्याप त्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जगभरात मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांची संख्या 6,000 पेक्षा जास्त झाली आहे. तर आफ्रिकेच्या काही भागात या विषाणूमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami