संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

मंत्र्यांच्या निवासस्थानाला किल्ल्यांची नावे देता, मग त्यांचे संवर्धनही करा!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आज शिवप्रेमी आणि गडप्रेमींनी आंदोलन केले. मंत्र्यांच्या निवासस्थानाला गडकिल्ल्यांचे नाव दिले आहेत. पण संवर्धन जबाबदारीने का केले जात नाही असा सवाल गडप्रेमींनी केला आहे. अखेर पोलिसांनी आंदोलकांना रोखले आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळानी मुख्यमंत्र्याची भेट घेतली.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून शिवप्रेमींनी रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन केले.सर्व आंदोलक भगव्या टोप्या आणि पांढरे सदरे घालून उपस्थित होते. राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता तर मग तुम्हाला शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी वेगळे महामंडळ स्थापन करावेच लागेलच, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.गडकिल्ल्यांची दुरावस्था झाल्याने स्वतंत्र महामंडळाची मागणी होत असल्याचे शिवप्रेमींनी सांगितले. तसेच तुम्हाला गडकिल्ल्यांचे संवर्धन करता येत नसेल तर मंत्र्यांच्या बंगल्याला किल्ल्याची नावे का दिली आहेत, असा सवालही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.आंदोलक मंत्रालयाच्या दिशेने वळत असताना पोलिसांनी आंदोलकांना रोखले. त्यानंतर पोलिसांसह आंदोलकांचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami