संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

मथुरेचे नागरिक राखी सावंतलाही निवडून देतील! कंगनाला टोला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मथुरा- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यात भाजपचे नेते देशातील विविध राज्यांचे दौरे करत आहेत. मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजप कंगना राणौतला तिकीट देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत मथुरेच्या विद्यमान खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांना विचारले असता, ही खूप चांगली गोष्ट आहे. मथुरेचे नागरिक राखी सावंतलाही निवडून देतील, असा टोला हेमामालिनी यांनी नाव न घेता कंगनाला लगावला.

हेमा मालिनी उत्तर प्रदेशातील मथुरेच्या भाजपच्या खासदार आहेत. सध्या त्या आपल्या मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप मथुरा लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणौतला उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. त्याविषयी हेमामालिनी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, खूप चांगली बाब आहे. माझे विचार देवावर अवलंबून आहेत. कोणी आणखी व्यक्ती जर मथुरेची खासदार म्हणून इच्छित असेल तर तुम्ही त्याला बनू देणार नाही. तुम्हाला मथुरेत फिल्मस्टारच हवा आहे? उद्या राखी सावंतलाही पाठवाल. ती पण खासदार होईल, असे उत्तर त्यांनी दिले. मथुरा लोकसभा मतदारसंघातून हेमामालिनी दोनदा निवडून आल्या आहेत. २०१४ मध्ये त्यांनी रालोदच्या जयंत चौधरींचा पराभव केला. त्यानंतर २०१९ मध्ये कुंवर नरेंद्र सिंग यांचा त्यांनी पराभव केला होता. कांगना राणौत यांनी दोनदा वृंदावनचा दौरा केला. काही दिवसांपूर्वीच तिने सहकुटुंब वृंदावनचा दौरा केला होता. त्यावेळी तेथे पूजा केली होती. इमर्जन्सी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या जन्मठिकाणी आलो आहोत, असे तिने सांगितले होते. मात्र राजकारणाशी संबंधित चर्चेला उत्तर देण्याचे तिने टाळले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami