चंदीगड- हरियाणा आता सरकारने आता मद्यप्रेमींसाठी कायद्यात मोठा बदल केला आहे. मद्यप्राशनासाठी वयात बदल केला आहे. 25 वर्षांवरून ही मर्यादा 21 वर्षांपर्यंत केली आहे. ही सवलत देताना विधानसभा एक्साइज कायदा 1914 च्या एकूण चार कलमांवर विचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हरियाणाच्या सुधारित उत्पादन शुल्क विधेयकाला राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची संमती मिळाली आहे. ही दुरुस्ती राज्यात 11 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली आहे. या कायद्यातील बदलानंतर आता कोणत्याही देशी दारू किंवा ड्रग्जच्या निर्मिती, घाऊक किंवा किरकोळ विक्रीसाठी वयोमर्यादाही कमी करण्यात आली आहे. कायद्यात सुधारणा केल्यानंतर राज्य सरकारने या व्यवसायाची वयोमर्यादा 25 वर्षांवरून 21 वर्षे केली आहे.वास्तविकता कलम 29 अंतर्गत लायसन्स विक्रेता 25 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तीला मद्य अथवा ड्रग्स वितरीत करू शकत नाही. मात्र अभ्यासानंतर ही वयोमर्यादा कमी करून 21 वर्षे केली आहे. कलम 30 अंतर्गत या अभ्यासानंतर 25 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीला मद्य विक्रीच्या दुकानावर कामावर ठेवण्यात येऊ शकते.मद्य विक्रीच्या दुकानात आता 21 वर्षांपर्यंतची व्यक्ती नोकरी करू शकते.