संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

मध्यप्रदेशात अवकाळी
पावसामुळे पिकांचे नुकसान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भोपाळ: महाराष्ट्रासह मध्यप्रदेश मध्येही अवकाळी पाऊस पडला. मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटही झाली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मंगळवारी भोपाळसह उज्जैन, रतलाम, मंदसौरमध्येही गारपिटीसह मुसळधार पाऊस पडला होता. मंदसौरमध्येही गारपिटीसह मुसळधार पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर पुढील काही दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली.

भोपाळ व्यतिरिक्त उज्जैन, नर्मदापुरम, सागर, रीवा, शहडोल, जबलपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ओलावा निर्माण होत असून, त्यामुळे राज्यात पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. 8 आणि 9 मार्चला राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ, रायसेन, खंडवा, खरगोन, बरवानी, बुरहानपूर, जबलपूर, नरसिंगपूर, कटनी, नर्मदापुरम, बैतुल, हरदा, ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, अशोकनगर दतिया, श्योपूर, मुरैना आणि भिंडसह २० जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या