संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते ठाणे आणि हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील उपनगरी गाड्या जलद मार्गावरून धावणार असून हार्बरची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा मेगाब्लॉक काळात बंद राहणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते ठाणे दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ दरम्यान मेगाब्लॉक आहे. त्यामुळे सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या काळात मध्य रेल्वेच्या धीम्या लोकल जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या रेल्वे स्थानकांत थांबतील. मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या लोकल १५ मिनिटे उशिराने धावतील. हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ दरम्यान मेगाब्लॉक आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यानची लोकल सेवा सुरू होणार आहे, असे रेल्वेने पत्रकात म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami