संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर रेल्वे मार्गावर उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरील जलद वाहतूक माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात आली आहे. हार्बर रेल्वेची छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल, बेलापूर सेवा मेगाब्लॉकमध्ये बंद राहणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या काळात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची जलद वाहतूक दादर ते ठाणे दरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात आली आहे. त्यामुळे काही लोकल रद्द झाल्या असून गाड्या १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक आहे. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर ही लोकल सेवा बंद राहणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक नाही. त्यामुळे ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यानची उपनगरी सेवा सुरू राहणार आहे, अशी माहिती रेल्वेने दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami