संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कुनो नॅशनल पार्कमध्ये सापडली प्राचीन नाणी !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भोपाळ – मध्य प्रदेशच्या श्योपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कुनो नॅशनल पार्कमध्ये खुदाई करताना अचानक मजुरांना दुर्मिळ प्राचीन नाण्यांचा हंडा सापडला आहे.काही महिन्यांपूर्वी हेच राष्ट्रीय उद्यान सोडलेल्या चित्त्यांमुळे चर्चेत आले होते. आता हे पार्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
कुनो नॅशनल पार्कमध्ये कर्मचार्‍यांसाठी घरे बांधण्यात येत आहे.यासाठी पालपूर किल्ला क्षेत्रात खोदकाम सुरू करण्यात आले आहे.याच परिसरात नामिबिया येथून आणण्यात आलेल्या चित्त्यांना ठेवले आहे.खोदकाम करत असताना अचानक मजुरांना एका ठिकाणी टणक वस्तू लागली.त्यानंतर त्यांना आजूबाजूची जमीन उकरून काढली. तेव्हा त्यांना तांबे आणि चांदीच्या नाण्यांनी भरलेला हंडा सापडला. जमिनीपासून काही फूट खाली हा हंडा पुरून ठेवण्यात आला होता. दरम्यान, याबाबत संबंधित अधिकार्‍यांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे म्हटले आहे. तर, डीएफओ पीके वर्मा यांनी याबाबत माहिती घेऊन चौकशी करू, असे म्हटले आहे.बुधवारी तिथे काम करणार्‍या मजुरांना नाण्यांनी भरलेला हंडा सापडला आहे. ज्या मजुरांना हा हंडा सापडला आहे त्यांनी सापडलेली नाणी आपापसांत वाटून घेतली असून ते गायब झाले आहेत. गुरुवारी हे मजूर कामावरच आले नाहीत. तसेच, काही मजुरांनी गुरुवारी याचे फोटो काढून व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसवर टाकले होते.स्टेटस पाहिल्यानंतर ही बातमी जंगलात वार्‍यासारखी आजूबाजूच्या गावांत पसरली आहे.पालपूर राजघराण्याने कुनो नॅशनल पार्कसाठी १ एकर जमीन दान केली होती.त्यानंतर ही जागा वाघांसाठी हस्तांतरित करण्यात आली होती. दरम्यान,या राजघराण्याचे वंशज आरके श्रीगोपाल देव सिंह यांनी सांगितले की, आम्ही असे ऐकले आहे की, याठिकाणी नाण्यांनी भरलेले चार हंडे सापडले आहेत. वन विभाग आणि पुरातत्व विभाग आमची संपत्ती गुप्त पद्धतीने नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही श्री गोपाल यांनी केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami