संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

मध्य रेल्वेचा ७२ तासांचा मेगाब्लॉक; कोकणच्या गाड्या ३ दिवस रद्द

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान ५, ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान शंभरपेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ३५० लोकल ट्रेनदेखील या मेगाब्लॉकदरम्यान धावणार नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेच्यावतीने देण्यात आली आहे. यावेळी कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी याबरोबरच डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेससह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.

सध्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठीच हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान ५ व्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि ६ व्या लाईनवर हा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या ३ दिवस बंद राहणार आहेत. त्यासोबतच दिवा-वसईदरम्यान धावणाऱ्या मेमु ट्रेनदेखील या काळात बंद राहणार आहेत. तर सर्व फास्ट गाड्या स्लो मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेकडून वारंवार घेण्यात येत असलेल्या या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत असून वाहतूकीचीदेखील समस्या निर्माण होते, मात्र ही समस्या सोडवण्यासाठी मागील ब्लॉकच्या वेळी महापालिका आणि रेल्वे विभागाच्यावतीने जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami