संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

मध्य, हार्बरचा मेगाब्लॉक रद्द! मात्र पश्चिम रेल्वेवर आज ब्लॉक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- पाच दिवसांच्या गणपतींचे उद्या रविवारी विसर्जन होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द केला आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या धीम्या लोकल जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली.

गणेशोत्सवामुळे रेल्वेने गेल्या रविवारी मेगाब्लॉक रद्द केला होता. आता उद्या ५ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन आहे. त्यामुळे लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावरील रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. परंतु पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान धीम्या अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक आहे. या काळात पश्चिम रेल्वेच्या लोकल जलद मार्गावरून धावणार आहेत. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द झाल्या असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत. विलेपार्ले स्थानकात लोकलला दोनदा थांबा दिला जाणार आहे. राम मंदिर स्थानकात फलाट नसल्यामुळे लोकल थांबणार नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami