संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

मनदीप कौरच्या आत्महत्येने अमेरिकेमध्ये प्रचंड खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

न्यूयॉर्क- 8 वर्षांपासून होत असलेल्या घरगुती अत्याचाराला कंटाळून मनदीप कौर या भारतीय महिलेने आत्महत्या केली. न्यूयॉर्कच्या रिचमंड येथे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण अमेरिका हादरली आहे. घरगुती अत्याचारांसोबत माझ्या पतीने अनेक महिलांची फसवणूक केली, असा आरोप तिने केला आहे. आत्महत्येपूर्वीचा मनदीपचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात तिने मला माझ्या मुलांना आता सोडून जावे लागेल, असे म्हटले होते.

मनदीप कौर आणि तिचा पती रणजोधबीर सिंग संधू हे मूळचे भारतातील उत्तर प्रदेशच्या बिजनौरचे आहेत. त्यांना 2 मुली आहेत. 8 वर्षांपासून पतीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून मनदीपने आत्महत्या केली. मी खूप दुःखी आहे. 8 वर्षे झाली मी माझ्या परीने प्रयत्न केले. मला रोज मारहाण झाली. तो कधीतरी सुधारेल या विचाराने मी त्याचा अत्याचार आणि मारहाण सहन करत आहे, पण नाही. त्याने मला 8 वर्षे मारहाण केली. त्याचे विवाहबाह्य संबंध होते. पहिली अडीच वर्षे आम्ही भारतात राहिलो. तो नरक होता. मग आम्ही येथे आलो. तो दारू पिऊन मला मारहाण करायचा. माझ्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
तेव्हा मला वाचवा, मला वाचवा, अशी तो भीक मागत होता. मी त्याला वाचवले. सासरच्यांनी मला काहीच मदत केली नाही. पण देव प्रत्येकाला शिक्षा देईल. मला माझ्या मुलांना सोडून आता जावे लागेल, असे मनदीपने व्हायरल केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे. तिची आत्महत्या आणि या व्हिडिओमुळे अमेरिकेत खळबळ
माजली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami