संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

मनसेची माजी नगरसेविका व कुख्यात गुंड जानन मारणेची पत्नी राष्ट्रवादीमध्ये दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- पुण्यात रुपाली ठोंबरे पाटील यांच्या पाठोपाठ मनसेतून आणखी एका महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका आणि कुख्यात गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि रुपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयश्री मारणे यांनी हा पक्ष प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्याची प्रतिक्रिया जयश्री मारणे यांनी पक्षप्रवेशावेळी दिली. मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे या २०१२ साली मनसेतून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र २०१७ च्या महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार जयश्री मारणे यांनी व्यक्त केला. पक्ष नेतृत्व संधी देईल, असा विश्वास मारणेंनी व्यक्त केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami