संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

मनसे प्रमुख राज ठाकरे ‘हिंदुहृदयसम्राट’; मुंबई परिसरात झळकले भलेमोठे बॅनर!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. त्यातच मुंबईत थेट राज ठाकरे हे ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख केलेले बॅनर झळकल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. घाटकोपरमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईतील घाटकोपर आणि चेंबूर परिसरात पदाधिकाऱ्यांनी भलेमोठे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर राज ठाकरे यांच्या नावापुढे ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख केला आहे. या बॅनरची जोरदार चर्चा मुंबईत होत आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणून संबोधतात. आता मनसेनेही हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात राज ठाकरे यांच्या स्वागताचे भलेमोठे बॅनर लावले आहेत. यात राज ठाकरे यांच्या नावासमोर ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami