संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

ममताविरोधात भाजपचे ‘नबन्ना’ अभियान तृणमूल आणि भाजपमध्ये पुन्हा संघर्ष

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलकाता- पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील सेटलकुचीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्या पुन्हा एकदा जोरदार संघर्ष पहायला मिळाला आहे. भाजपाने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार आणि भ्रष्टाचाराविरोधात ‘नबन्ना चलो मोर्चा’चे आयोजन केले आहे. त्यासाठी राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना मंगळवारी कोलकात्यात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र मोर्चाला पोलिसांनी परवानगी नसल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी अडवले गेले. याच कारणामुळे राणीगंज रेल्वे स्थानक परिसरात पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

नबन्ना मोहिमेला मंजुरी न मिळाल्याने पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष एस मजुमदार यांनी ममता सरकारवर निशाणा साधला आहे. टीएमसी सरकारवर हल्लाबोल करताना मजुमदार म्हणाले की, आंदोलन करण्यासाठी परवानगी का घेतली पाहिजे? पश्चिम बंगालचे पोलीस टीएमसी कार्यकर्त्यांसारखे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, गेल्या वेळी आम्ही नबन्ना मार्च काढला, तेव्हा आम्हाला रोखण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आली होती. बंगाल वाचवण्याच्या लढाईत आम्ही पुन्हा एकदा हा मोर्चा काढू, असे मजुमदार म्हणाले आहे. जर आम्हाला परवानगी दिली नाही तर पुन्हा हाणामारी होऊ शकते.

नबन्ना मोहीम यशस्वी करण्यासाठी बंगालमध्ये भाजपने उत्तर बंगाल आणि जंगलमहाल येथून कार्यकर्त्यांना आणण्यासाठी 7 गाड्या बुक केल्या आहेत, परंतु बंगाल पोलीस आणि ममता बॅनर्जी सरकारने ही मोहीम अयशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आरोप भाजपने लावले आहे. कोलकात्यात आलेल्या भाजप समर्थकांची धरपकड करण्यात आली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami