संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

ममता बॅनर्जींच्या आणखी एकामंत्र्यावर सीबीआयची धाडी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलकाता – कोळसा घोटाळा प्रकरणात सीबीआयने तृणमूलचे नेते आणि ममता बॅनर्जींच्या सरकारमधील कायदा मंत्री मलय घटक यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर धाडी टाकल्या. त्यांच्या कोलकात्यातील चार मालमतांवर तर आसनसोलमधील एका ठिकाणावर सीबीआयच्या पथकाने कारवाई केली.

20 सप्टेंबर 2012 रोजी कोळसा घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून खटला दाखल करण्यात आला होता. सीबीआयने ‘ग्रेस` कंपनीचे संचालक मुकेश गुप्ता यांच्याविरोधात 28 ऑक्टोबर 2014 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. याच प्रकरणात आता मलय घटक सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांची दिल्लीतील कोळसा चोरी प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांच्यानंतर तृणमुल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी क्रमांक दोनचे प्रभावी नेते मानले जातात. या प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा नरुला आणि त्यांच्या बहिणीची देखील तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami