संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

मराठा क्रांती ठोक मोर्चाचा शिंदेंच्या मेळाव्याला पाठिंबा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई :  मराठा क्रांती ठोक मोर्चाने दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडवले म्हणून पाठिंबा देत असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी म्हटले. दसरा मेळाव्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अनेक कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झाल्याचा दावा केरे यांनी केला.

यंदा शिवसेनेचे ऐतिहासिक दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. यासाठी मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कोणाचा मेळावा भव्य-दिव्य होतो यासाठी मोठी स्पर्धा सुरु आहे.या चढाओढीतच आता मराठा क्रांती ठोक मोर्चाने शिंदे गटाच्या मेळाव्याला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडवल्यामुळे त्यांना पाठिंबा देत असल्याचा दावा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केला.दरम्यान, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्याची भूमिका मांडण्यात आली होती.या बैठकीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरदार भाषणे झाली.यापुढे मराठा बांधव रस्त्यावर उतरुन शिंदेंना पाठिंबा देईल,असा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami