संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार
यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारे ज्येष्ठ नेते शशिकांत पवार यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. कोकणातून मुंबईत परतत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.त्यांच्या निधनाने मराठा चळवळीतील हुशार आणि संयमी नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. शशिकांत पवार यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, वीरेंद्र व योगेश हे दोन मुलगे,मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रत्नागिरी मराठी बिझनेसमन फोरमच्या बैठकीसाठी रविवारी ते मुंबईहून गेले होते. परतत असताना पाली परिसरात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड आदींच्या पुढाकाराने १९०० च्या आसपास क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज ही संस्था सुरू झाली. १९८१ मध्ये तिचे नाव बदलून अखिल भारतीय मराठी महासंघ असे करण्यात आले. १९६४ सालापासून पवार या संस्थेत काम करत होते. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर १९९० च्या आसपास पवारांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. वकिली आणि व्यवसाय सोडून त्यांनी समाजाच्या कामासाठी झोकून दिले. मराठा आरक्षणासाठी शशिकांत पवार यांनी अनेक आंदोलन केली होती.ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या