संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

मराठा महासंघ आक्रमक; उद्या पंढरपूर बंदची हाक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पंढरपूर – मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल उपोषणास्त्र उपसले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत. त्यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. उपोषणाच्या दुसर्‍या दिवशीही राज्यभरातूनही विविध मराठा संघटना आणि नेत्यांनी संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा देत उपोषण सुरु केले आहे. पंढरपूरातही संभाजीराजेेंच्या उपोषणाला मराठा महासंघाने पाठिंबा दिला आहे. उद्या सोमवारी मराठा महासंघातर्फेे पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे.

यावेळी बोलताना मराठा महासंघाचे अर्जुन चव्हाण यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षेे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. अण्णासाहेब पाटील यांनी विधानसभेवर 1981 साली लाखोेंचा मोर्चा काढला होता. मात्र मराठा समाजाच्या मागण्या काही मान्य झाल्या नाहीत. आताही मराठा समाजाने 58 मोर्चेे काढले. आरक्षणासाठी तरुणांनी बलिदान दिले. आता संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत. या सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. सरकार आमची फसवणुक करत आहे. संभाजीराजेेंना पाठिंबा देण्यासाठी उद्या सोमवारी आम्ही पंढरपूर बंदची हाक दिली आहे. व्यापारी आणि नागरिकांनी त्याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, आज उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी संभाजीराजे यांची तब्येत बिघडली होती. त्यांना अस्वस्थ वाटूू लागल्याने डॉक्टरांच्या पथकाला बोलावण्यात आले होते. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना तपासून आराम करण्याचा सल्ला दिला. यावेळी शिवसेनेचे खा. अरविंद सावंत, अनिल देसाई, महापौर किशोरी पेडणेकर यांनीही उपोषण स्थळी संभाजीराजेेंची भेट घेतली. त्यावेळी मराठा समाजाच्या तरुणांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami