संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

मराठा समाजा विषयीचे वक्तव्य भोवले पोलिस निरीक्षक किरणकुमार निलंबीत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव – मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेवर निलंबनाची कारवाई झाली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी ही कारवाई केली.
गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेने मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह उद्गार काढले होते. त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे मराठा समाजात संताप पसरला. त्यांनी याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन कारवाईची मागणी केली. मराठा संघटनांच्या वाढलेल्या दबावामुळे पोलिस महानिरीक्षक शेखर यांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी बकाले याच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्याची खात्याअंतर्गत चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami