संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मराठी भाषा ही अभिजात भाषा असल्याचे अनेक पुराव्यांवरून सिध्द झाले असतानाही या बहुमानापासून वंचित आहे. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जनअभियान राबविण्यात येत आहे. या जनअभियानात सहभागी होऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. हा विषय जिव्हाळ्याचा असून सर्वांचे योगदान मिळाले तर नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंत्री सुभाष देसाई यांनी ‘अभिजात मराठी जनअभियान’ या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला लेखक रंगनाथ पठारे, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, संगीतकार कौशल इनामदार उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ मिळावा यासाठी जनअभियान सुरु करण्यात आले आहे. ज्ञानभाषा, राजभाषा, लोकभाषा आदी अभिजात दर्जासाठीच्या सर्व निकषांवर मराठी भाषा पात्र ठरत आहे. तसा अहवालच रंगनाथ पठारे समितीकडून केेंद्र सरकारला 12 जुलै 2013 रोजी सादर करण्यात आला होता. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली. संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेत संसदीय कार्य, संस्कृती मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. त्यामुळे 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे. त्या दिवशी किंवा त्याआधी अभिजात दर्जा मिळाला तर आनंदाची गोष्ट आहे, असे देसाई म्हणाले. देसाई पुढे म्हणाले की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पोस्टकार्ड पाठविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आपण सवार्र्ंनी यात सहभाग नोेंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ‘शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे’ हा 17 मिनिटांचा एक लघुपटही दाखविण्यात आला. हा लघुपट सर्व महाविद्यालयांना पाठविण्यात येणार असून विद्यार्थी व प्राचार्य यांनी चर्चा घडवून आणावी असा उपक्रम हाती घ्यावा, अशी विनंती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना केल्याची माहितीही मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami