मलकापूर सहकारी बँकेवर कारवाई १० हजार रुपये काढण्याची परवानगी

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील मलकापूर नागरी सहकारी बँकेवर आरबीआयने कारवाई केली आहे. या बँकेवर निर्बंध घातल्यामुळे खातेदार आणि ठेवीदारांना केवळ १० हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. यामुळे हजारो ठेवीदार आणि खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकले आहेत. त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत.

मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने कर्ज देताना नियमांचे पालन केले नाही. बँकेने दिलेली कर्जे मोठ्या प्रमाणात थकली आहेत. ती वसूल होत नसल्यामुळे बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आरबीआयने या बँकेवर बुधवारी सायंकाळपासून ६ महिन्यांसाठी कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे बँकेला नवीन कर्ज किंवा कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही. मालमत्ता तारण किंवा गहाण ठेवता येणार नाही. ती विकता येणार नाही. त्यासाठी आरबीआयची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे बॅंकेचे खातेदार आणि ठेवीदारांना केवळ १० हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मुभा आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. सध्या ते ६ महिन्यांसाठी लागू केले असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

Close Bitnami banner
Bitnami