संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

मला मौन पाळण्याच्या सूचना! राज्यपालांची मीडियाकडे पाठ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- आपल्या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय पक्षांच्या टीकेचे लक्ष बनलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आता मात्र मौन बाळगले आहे. गुजराती राजस्थानी महाराष्ट्रातून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही. असे वादग्रस्त विधान करणार्‍या राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे राज्यपालांवर माफी मागण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर त्यांना प्रसारमाध्यमांशी न बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आता त्यांनी प्रसारमाध्यमांकडे पाठ फिरवली आहे.

आज महाराष्ट्र सदनात राज्यपालांच्या हस्ते ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांनी राज्यपालांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले. प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच त्यांनी तिथून काढता पाय घेतला. ते फक्त एवढेच म्हणाले की मी बोलणार नाही. कारण मला न बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे इथे मुख्यमंत्री उपस्थित आहेत तुम्ही त्यांच्याशी बोला, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. मात्र राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असताना त्यांना बोलण्यास कोणी मनाई केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राज्यपालांच्या वादग्रस्त विधानांमुळे या पूर्वीही अनेक वाद निर्माण झाले आहेत आणि याच वादांमुळे महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष त्यांच्यावर नाराज आहेत

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami