मलिकांचा वानखेडेंवर फोटोबॉम्ब; मुस्लिम वेशातील फोटो केले शेअर

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सातत्याने एनसीबीचे मुंबईचे झोनल संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत असून काल मध्यरात्री नवाब मलिकांनी ट्विटकरून फोटो बॉम्ब टाकला. त्या फोटोमध्ये वानखेडे हे मुस्लिम वेशात मौलानासमोर बसलेले दिसत आहेत. कबूल है, कबूल है, कबूल है यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?, अशी फोटो ओळ देखील नवाब मलिक यांनी दिली आहे. हा फोटो समीर वानखेडेंच्या निकाहच्या वेळेचा असल्याचा दावा त्यांनी केला.

नवाब मलिक यांच्या ट्विटनंतर लगेच ज्ञानदेव वानखेडे यांनी आपला मुलगा समीर वानखेडे हिंदू धर्माचे पालन करत असल्याचे काही फोटो शेअर केले. या फोटोत समीर वानखेडे हिंदू देवांची पुजा करताना दिसत आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षणाअंतर्गत आयआरएसमध्ये नोकरी मिळवल्याचा मलिक यांचा आरोप असून मलिकांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये डावीकडे बसलेली व्यक्ती ही समीर वानखेडे आहेत. त्यांच्यासमोर मुस्लीम धर्मगुरु बसल्याचे दिसत आहे. वानखेडे हे निकाहनाम्यावर स्वाक्षरी करत असल्याचे या फोटोत दिसत आहे. वानखेडे कुटुंबीय आम्ही मुस्लिम नसून हिंदू आहोत, असेे सांगत आहेत.

Close Bitnami banner
Bitnami