संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

मलिकांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने भाजपने आझाद मैदानातून निवडणुकीचे बिगुल फुंकले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने भाजपने आझाद मैदानातून निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे. आज जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. आझाद मैदानात झालेल्या सभेत बोलताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुखांचा राजीनामा घेता, संजय राठोडांचा राजीनामा घेता तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालतं का? तुम्ही कुणाच्या दाढ्या कुरवाळताय हे आम्हाला समजलं पाहिजे. नवाबचा राजीनामा का घेत नाही हे समजलं पाहिजे. तुम्ही राजीनामा घेतला नाही तर आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. आज मोर्चाची सुरुवात आहे, हा संघर्ष सुरूच राहील. मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवया आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

फडणवीस म्हणाले की, आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागतो. शरद पवारसाहेब म्हणतात देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं नसेल जमत तर सोडून द्या, तुम्ही सरकार चालवताय. तुम्हाला सरकार लखलाभ असो. पण एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल. मुंबईचे चिंधडे चिंधडे उडवणारा मंत्रिमंडळात होता तेव्हा तुम्ही काय केलं? असं बाळासाहेब विचारतील तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल? आम्ही सांगू नाही बाळसााहेब आम्ही संघर्ष केला. पण आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. सत्तेसाठी आंधळे झाले होते. ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाही. राजीनामा मागितला तर सरकार जाईल अशी भीती त्यांना वाटत होती, असं आम्ही बाळासाहेबांना सांगू, असा घणाघाती हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपने आज विराट मोर्चाचं आयोजन केलं होतं.तेथे कडक पोलीस बंदोबस्त तेथे ठरवण्यात आला होता. आझाद मैदानात मोर्चेकरी जमले होते, यावेळी फडणवीस यांनी हा घणाघाती हल्ला चढवला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सरकारला घेरले. सुरुवातीला हा मोर्चा राणीची बाग ते आझाद मैदान असा काढण्यात येणार होता. पण नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा मोर्चा काढण्यात आला. हजारो भाजपा कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी झाले होते. पोलिसांनी मोर्चा रोखल्यास कोणीही पोलिसांसोबत संघर्ष करु नका, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. हा मोर्चा मेट्रो सिनेमागृहाजवळ आल्यानात पोलिसांनी अडवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्यासह भाजपा नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतले. काही वेळानंतर भाजपा नेते फडणवीस यांना पोलिसांनी सोडले. त्यावेळी ते म्हणाले की, आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami