कौलालंपूर- मलेशियाची राजधानी कुआलालांपुर मधील सेलांगर भागात आज शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या मोठे भूस्खलन झाले.मोठी दरड कोसळल्याने आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. २० जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन आणि बचाव विभागाने दिलेल्या माहितीनुसार,ढिगाऱ्यातून २३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,मृतांमध्ये एक ५ वर्षीय मुलाचा आणि एका महिलेचा समावेश आहे. अन्य सात जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सुमारे ४०० पोलिस तैनात करण्यात आले होते.या दुर्घटनेतील मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पिकनिक स्पॉट असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला आहे. येथे एक फार्म हाऊस होते, ज्यामध्ये ७९ लोक होते. अधिकाऱ्याने सांगितले की,फार्म हाऊसजवळ अंदाजे १०० फुट म्हणजे ३० मीटर उंचीवरून खडक रस्त्यावर पडले आणि १.२ हेक्टर परिसरात पसरले.