संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन 

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे आज हृदय विकाराच्या झटका आल्याने निधन झाले. ते ६१ वर्षाचे होते. कोट्टायम प्रदीप यांचे असे आकस्मिक मृत्यू झाल्याने मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत. 

पृथ्वीराज सुकुमार यांनी ही बातमी सोशल मीडियावर दिली आहे. गुरुवारी अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी ज्युनिअर कलाकार म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. प्रदीप यांनी २००१ साली ‘आईवीससी’द्वारे दिग्दर्शित चित्रपट ‘ईईनडू इनले वरे’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. ‘विन्नैथंडी वरुवाया’, ‘आदु, वडक्कन सेल्फी’, ‘कट्टप्पनयिले ऋथिक रोशन’, ‘थोपिल जोप्पन’ आणि ‘कुंजिरमायणम’ या चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

अभिनेत्याच्या अनेक चाहते तसेच कलाकार सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांचे नाव प्रदीप के आर हे होते. परंतु कोट्टायम प्रदीप म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. त्यांनी चित्रपटात जास्त करून विनोदी पात्र निभावले आहेत. त्यांनी आता पर्यंत जवळपास ७० चित्रपटात काम केले आहे. प्रदीप यांनी अनेक विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांचे नेहमीच कौतुक झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami