संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी शनिवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. उदयपूरमध्ये झालेल्या ‘एक नेता, एक पद` ठरावाचे पालन करत त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे राजीनामा पाठवला. त्यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी पी चिदंबरम आणि दिग्विजय सिंग यांची नावे चर्चेत आहेत.
राजीनामा दिल्यानंतर खरगे म्हणाले की, ‘काँग्रेसच्या एका नेत्याच्या एका पदाच्या नियमानुसार मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचा निर्णय घेतला आहे.

खरगे यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे.‘ काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. खरगे यांनी 30 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यानंतर आता 17 ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. खरगे यांच्या विरोधात काँग्रेस नेते शशी थरूर आहेत. खरगे यांना गांधी घराण्याकडून झुकते माप असल्याने त्यांचा विजय होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यांनी नामनिर्देशन केले तेव्हा त्यांच्यासोबत 30 प्रस्तावक उपस्थित होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami