नवी दिल्ली :- शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आणि ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव एकनाथ शिंदे गटाकडे राहील असे जाहीर केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. अशातच आज पुन्हा समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याची मागणी करणार निवेदन पाठवण्याचे समता पक्षाचे नेते उदय मंडळ यांनी जारी केलेल्या एका व्हिडिओत म्हटले.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला तात्पुरते मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. यावेळी समता पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र समता पक्षाचा दावा न्यायालयाने फेटाळला होता. २००४ ला रजिस्ट्रेशन केलेल्या समता पक्षाला तेव्हा मशाल हे चिन्ह दिले होते, तेव्हापासून या पक्षाने हे चिन्ह वापरले नव्हते. त्यामुळे निवडणूक आयोगाने हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला दिले होते. आता हे चिन्ह समता पक्षालाच मिळावे यासाठी आज पक्षाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला त्यांनी निवेदन दिले