महसूल वाढवण्यासाठी महिलांसाठी ‘वुमन स्पेशल वाइन शॉप’ उघडणार, वाईन फेस्टिव्हलचेही आयोजन

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

भोपाळ – राज्यात उमा भारतीसारख्या फायरब्रँड महिला नेत्या दारू विक्री विरोधात आक्रमक भूमिका घेत असताना, मध्य प्रदेशात चक्क महिलांसाठी वुमन स्पेशल वाइन शॉप उघडण्यात येणार आहे. येत्या एप्रिल २०२२ पर्यंत मध्यप्रदेशात अशी खास महिलांसाठीची दुकानं थाटलेली पाहता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल मिळवण्यासाठी मध्य प्रदेश सरकारदेखील तितकेच आग्रही असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारी तिजोरी भरण्यासाठी सरकार महिलांसाठीचे वाइन शॉप उघडण्याच्या तयारीला लागले आहे. तसेच मद्यविक्री वाढवण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने अफलातून फंडा काढला आहे. राज्यातील चार प्रमुख शहरांमध्ये प्रथमच वुमन वाइन शॉप उघडले जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश सरकार सुरुवातीला राज्यातील चार महानगरांमध्ये महिलांसाठीचे खास वाईन शॉप उघडणार असून, भोपाळ, जबलपूर, इंदौर आणि ग्वाल्हेर अशा चार शहरांचा समावेश यात आहे. इथे फक्त महिलांसाठी, महिलांना आवडणारी मद्यविक्री केली जाईल. तसेच महिलांना वाइन शॉपचा आनंद घेता यावा, यासाठी मध्य प्रदेश सरकारतर्फे विशेष काळजीदेखील घेतली जाणार आहे. आठवड्यातील काही दिवसच ही दुकाने सुरु राहतील. तसेच महिलांसाठीचे हे वाइन शॉप मॉल्ससारख्या सुरक्षित ठिकाणी उघडली जातील. जेणेकरून तेथे महिला सहजपणे पोहोचू शकतील आणि त्यांच्या सुरक्षेची काळजीही घेतली जाईल. तसेच महिलांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या या वाइन शॉपला किती प्रतिसाद मिळतोय, याची चाचपणीदेखील मध्यप्रदेश सरकारतर्फे केली जाईल. त्यानंतर वाइन शॉपमध्ये येण्यासाठी तसेच वाइन खरेदीसाठी महिलांना प्रोत्साहन दिले जाईल

याकरिता वाइन फेस्टिवलचेही आयोजन केले जाऊ शकते. दरम्यान, सध्या तरी महसूल विभागाकडे यासंदर्भातील ठोस आदेश आलेले नसले तरीही येत्या काळात मध्य प्रदेशात वुमन वाइन शॉपचे चकाचक दृश्य दृष्टीस पडू शकणार आहेत. मात्र या साऱ्या प्रकारात भाजपच्या फायरब्रँड उमा भारती यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला दारुबंदीवरून घेरले आहे. १५ जानेवारी २०२२ पर्यंत सरकारने दारुबंदी केली नाही तर सरकारविरोधात आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे उमा भारतींच्या या विरोधासमोर सरकारची योजना कितपत पूर्ण होऊ शकते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Close Bitnami banner
Bitnami