संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

महागाईत गुंतवणूकदारांना Gold EFTचे सर्वाधिक आकर्षण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोने ही कायमच चांगली गुंतवणूक मानली जाते. वाढत्या महागाईच्या काळातही याकडे गुंतवणूकदारांचे आकर्षण कायम आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाचे म्हणणे आहे की, उच्च महागाई दर आणि वाढत्या बाजार मूल्यांकनामुळे डिजिटल सोने म्हणजेच गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.

गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 4,814 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. 2020 मध्ये ती 6,657 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, जागतिक रिकव्हरी आणि चांगल्या गुंतवणूकदारांच्या सेंटिमेट्समुळे 2021 मध्ये सोन्याच्या ईटीएफ प्रवाहात महामारीच्या वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. मात्र उच्च चलनवाढीचा दर आणि यूएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेमुळे 2022 मध्येही गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांचा कल असेल.

तसेच तज्ज्ञ असेही सांगतात की, गोल्ड ईटीएफ वर्षभर गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. शेअर्समध्ये तेजी असूनही त्याचे आकर्षण कायम राहिले. गेल्या वर्षी केवळ जुलैमध्ये गोल्ड ईटीएफमधून पैसे काढले गेले. जुलैमध्ये गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमधून 61.5 कोटी रुपये काढले. डिसेंबर 2021 पर्यंत गोल्ड फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 30 टक्क्यांनी वाढून 18,405 कोटी झाली आहे, गुंतवणुकीचा ओघ एक वर्षापूर्वी 14,174 कोटी रुपये होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami