संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

महाबळेश्वरमध्ये थंडीने दवबिंदू गोठले; पहाटे तापमान ५ अंशापर्यंत घसरले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा – सातारा जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तर या थंडीने आज अचानक कहर केला. वेण्णालेक ते लिंगमळा या परिसरातील आज पहाटे तापमान ५ ते ६ अंशांपर्यंत खाली गेल्याने या भागात अनेक ठिकाणी दवबिंदू गोठले.

वेण्णालेकच्या लोखंडी जेटी, वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील वाहनांच्या टपांवर, स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये फुलांवर, तसेच स्मृतिवन परिसरात दिसेल तिथे लांबच लांब हिमकणांचा सडा पाहावयास मिळाला. काल अचानक हुडहुडी भरल्याने कडाक्याच्या थंडीने जनजीवन विस्कळित झाले आहे. महाबळेश्वर शहरासह वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरात थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे. या कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा म्हणून वेण्णालेक लिंगमळा परिसरात धाबे, रेस्टॉरंटच्या बाहेर शेकोट्या पेटविल्या होत्या. तर मुख्य बाजारपेठेत पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करून फेरफटका मारताना पाहावयास मिळत होते. महाबळेश्वर सोडून १५ ते २० किलोमीटर खाली गेल्यावर बोचरी थंडी व महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडी यातील फरक पर्यटक अनुभवत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami