संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

महाबळेश्वरला निघालेल्या पर्यटकांची बस प्रवाशांच्या साहित्यासह जळून खाक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा – महाबळेश्वरला निघालेल्या पर्यटकांच्या चालत्या बसला अचानक आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली असल्याची बातमी समोर आली आहे. वाई-महाबळेश्वर या मार्गावरील पसरणी घाटात नागेवाडी फाट्याजवळ या खाजगी बसने पेट घेतला असल्याचे समजते. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु प्रवाशांच्या साहित्यासह संपूर्ण बस जळून खाक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने शेजारील वाहन चालकांच्या सतर्कतेमुळे सर्व पर्यटक काही मिनिटातच बसमधून उतरल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव येथील खाजगी कंपनीमधील कर्मचाऱ्यांची सहल सपकाळ ट्रॅव्हलच्या बस एम.एच.०६ एस. ९३४५ ने पंढरपूरला गेली होती. तेथून रविवारी सकाळी मांढरदेव मार्गे महाबळेश्वरला निघाले असता, दुपारी ३ च्या सुमारास पसरणी घाटात बस आली. त्यावेळी शेजारून जाणाऱ्या वाहन चालकाने बसमधून धूर येत असल्याचे चालकास सांगून सतर्क केले. चालक रवींद्र कोल्स्कर यांनी प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतील सर्व प्रवाशी खाली उतरविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या बस मध्ये लहान मुलांसह ३९ प्रवासी होते. या घटनेची माहिती मिळताच वाई व पाचगणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घरणस्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वाई-पाचगणी अग्निशमन बंबाला पाचारण केले. वाई पालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझविण्याचे प्रयत्न केले. परंतु संपूर्ण बस जाळून खाक झाली. दरम्यान, या घटनेमुळे वाई पाचगणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. बस ला लागलेली आग विझविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami