संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

महाराष्ट्रातील भाजपात घराणेशाही! माजी मंत्री लोणीकरांच्या मुलाची युवा मोर्चा अध्यक्षस्थपदी नियुक्ती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- देश पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजप नेते सातत्याने घराणेशाहीचे आरोप करून कॉंग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न करत असतात.इकडे महाराष्ट्रातील भाजपात मात्र घराणेशाही अनेक ठिकाणी दिसून येते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.अशीच एक ताजी घटना समोर आली आहे.भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या मुलाची म्हणजेच राहुल लोणीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राहुल लोणीकर हे युवा मोर्चाचे सरचिटणीस होते. त्यानंतर आता भाजपा युवा मोर्चाच्या मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,माजी प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत राहुल लोणीकर यांची युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी घोषणा करण्यात आली.राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची पावले उचण्यास सुरुवात झाली आहे.भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षची काल निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वास्तविक माजी मंत्री बबन लोणीकर यांची पुन्हा मंत्री बनण्याची इच्छा होती.पण त्यांच्या मुलाला या पदावर बसवून त्यांना मंत्रिपदापासून दूर केल्याचे बोलले जात आहे.तशी भाजपात घराणेशाही असल्याचे पुरावे नारायण राणे,राधाकृष्ण विखे-पाटील,डॉ.विजयकुमार गावित, गिरीश महाजन यांच्याकडे पाहिल्यावर मिळतात.त्यात आता बबनराव लोणीकरांचे घ्यावे लागणार आहे.कॉंग्रेसच्या महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत हे आहेत.आता भाजपाने सुद्धा लोणीकरांच्या मुलाला आपल्या पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद देऊन कॉंग्रेसमधील घराणेशाही आरोपाची बरोबरी केली आहे.
दरम्यान,भाजपच्या तरुण नेत्यांमध्ये या पदाचे आकर्षण असते. भाजपच्या अनेक विद्यमान नेत्यांनी या पदावर काम करून पुढे राज्यात आपला ठसा उमटवला.विक्रांत पाटील, योगेश टिळेकर यांच्यासह पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर अशा तरुण नेत्यांनी गेल्या दशकात या पदावर काम केले आहे.त्याआधी गोपीनाथ मुंडे,ना.स. फरांदे या नेत्यांनीही युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात आपला ठसा उमटविला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami