संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

महाराष्ट्रातील ३ सहकारी बँकांसह ४ बँकांना आरबीआयचा लाखोंचा दंड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

महाराष्ट्रातील ३ आणि मध्य प्रदेशातील १ अशा ४ सहकारी बँकांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने दंड ठोठावला आहे. या ४ बँकांना एकंदर ४ लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यात नांदेड मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि अंदरसुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक या महाराष्ट्रातील ३ बँकांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेने बँकिंगसंदर्भात काही नियम घालून दिले आहेत. त्यांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर दंडाची कारवाई केली जाते. अशाच प्रकारे नियम मोडणाऱ्या ४ सहकारी बँकांवर आरबीआयने दंडाच्या कारवाईचा बडगा उगारला. त्यात महाराष्ट्रातील ३ आणि मध्य प्रदेशातील एका बँकेचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अंदरसुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला १ लाख ५० हजार, अहमदपूर येथील महेश को-ऑपरेटिव्ह बँकेला १ लाख रुपये आणि नांदेडच्या नांदेड मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. मध्य प्रदेशातील शहाडोलमधील जिल्हा सहकारी बँकेलाही १ लाखाचा दंड केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami