संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

महाराष्ट्र-गुजरातला जोडणारा रंका नदीवरील पूल अचानक कोसळला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नंदुरबार – नंदुरबार तालुक्यातील राज्य महामार्ग सहावर असलेल्या आणि धानोरागाव मार्गे गुजरात राज्यात जाणाऱ्या रस्त्यावरील रंका नदीवरील पूल आज गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.प्रवासी बस,ट्रक आणि एक बैलगाडी गेल्यानंतर काही क्षणात हा पूल कोसळला.
हा पूल मध्यभागी तडा पडून नदीत कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याच्या सीमेलगत आहे. ४० ते ५० किमी अंतरावर गुजरात राज्याची सीमा हद्द असल्याने नंदुरबार येथून बहुतांशी नागरिक गुजरातला जाण्यासाठी राज्यमार्ग क्रमांक सहा असलेल्या नंदुरबार तालुक्यातील धानोरा मार्गे जात असतात, त्यामुळे या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. परंतु राज्य महामार्ग सहावर असलेल्या धानोरा- इसाइ गावाजवळ रंका नदीवर ६८ मीटर लांबीचा हा पूल आज अचानक कोसळला. हा पूल कोसळण्याआधी काही क्षण एक प्रवासी बस, ट्रक आणि एका शेतकर्‍याची बैलगाडी तिथून पुढे गेली होती. पूल कोसळल्यानंतरही एक एसटी बस सुसाट पुलावरून चालली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी थांबण्याचा इशारा केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.हा पूल १९८२ साली म्हणजे ४० वर्षांपूर्वी चुना,माती आणि दगड वापरून हा बांधण्यात आला होता.हा पूल कोसळल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.नेहमी वर्दळीचा असलेल्या राज्य महामार्गावरील धानोरा रस्त्यावरून वाहने ये-जा करीत असतात.मात्र सुदैवाने ही वाहने यावेळी जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami