संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील चेकपोस्टवर खडसेंचा ठिय्या!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव :- चेकपोस्टवर अवैधरीत्या टोलवसुली सुरु असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर ठिय्या दिला. तीन तासांपेक्षा जास्त वेळ खडसे यांनी ठिय्या आंदोलनकरत प्रशासनाचं लक्ष वेधून घेतला. अवैध टोलवसुली प्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोपही खडसेंनी यावेळी केला.

राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी अवैध टोलवसुलीविरोधात आवाज उठवला आहे. एकनाथ खडसे यांनी चेकपोस्टवर जाऊन काल ठिय्या आंदोलन केलं. जळगावमध्ये आपल्या मतदारसंघातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश चेकपोस्टवर त्यांनी आंदोलन केलं. यावेळी खडसे यांच्यासोबत त्यांच्ये काही कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.टोल नाक्यावरील पोलिसांना एकनाथ खडसे यांनी जाब विचारला. कुणाच्या आशीर्वादाने ही टोल वसुली सुरु आहे, यावेळी चेकपोस्टवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी एकनाथ खडसे यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला.

खडसे यांनी आरोप केला आहे की, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर ते थांबले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रक चालकांकडून पैसे घेतात. ओव्हरलोड ट्रक असेल तर 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत रक्कम पोलीस घेत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होता. या चेकपोस्टवरील वजनकाटे कामच करत नाहीत. वरच्या वर रक्कम घेऊन अवैध पद्धतीने पैसा घेतला जात आहे. दोनशे रुपयांपासून दोन ते आठ हजार रुपयांपर्यंत पैसे ट्रक चालकांकडून घेतले जातात. दरम्यान, मी चेकपोस्टवर येत असल्याचं कळताच जमा केलेल्या पेसै घेऊन एका व्यक्तीने आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मदतीने पळ काळला, असा आरोप खडसे यांनी केला.याप्रकरणी पोलीस तक्रार नोंदवून एन्टी करप्शनने कारवाई करावी, अशी मागणी खडसेंनी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami