कोल्हापूर – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी अजून कोरोना गेलेला नाही. त्यामुळे निर्बंध शिथिल केले जातील पण तूर्तास तरी मास्क मुक्ती करून कोणतेही संकट ओढून घ्यायचे नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
आज कोल्हापू मध्ये पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांना मास्कबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की, युके आणि काही पश्चात देशांनी मास्कमुक्ती केली आहे, पण त्यांनी तसा निर्णय का घेतला याचा अभ्यास करावा लागेल. आपण याबाबतची सर्व माहिती संकलित करीत आहोत, असे टोपे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले इतक्या मोठ्या लोकशाही देशात तत्काळ मास्कमुक्ती करून कोणतेही संकट ओढवून घ्यायचे नाही. कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. जानेवारी महिन्यात रुग्णसंख्या वाढली होती, पण आता फेब्रुवारीत ती कमी झालीय. त्यामुळे निर्बंध शिथिल केले जातील नाट्यगृह, सिनेमागृह,बार, रेस्टोरंट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरु करण्याबाबतच विचार सुरु आहे. राज्य सरकारने जानेवारीपूर्वी लावलेले निर्बंध हटवले आहेत. आता फेब्रुवारीच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक केला जाईल, असे टोपे यांनी सांगितले. राजेश टोपे यांनी दिलेल्या या माहितीमुळे आता मास्क अहून काही काळ लावावाच लागणार आहे.