संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

महाविकास आघाडीतील नेत्यांची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गुरुवारपासून मुंबईत सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी सात वाजता मुंबईतील भुजबळांच्या रामटेक बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावली आहे. या बैठकीत अधिवेशनातील सत्ताधारी पक्षाची रणनीती ठरणार आहे. त्याच बरोबर विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवरही चर्चा होणार आहे. कारण अधिवेशनाच्या दुसऱ्याच आठवड्यात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

सध्या भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात जो संघर्ष सुरु आहे तो पाहता अर्थसंकल्पीय अधिवेशन वाढण्याची शक्यता आहे. कारण या अधिवेशनात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सेना भाजपात सुरु असलेले घोटाळ्यांचे आरोप प्रत्यारोप, केंद्राकडून वेळेवर मिळत नसलेला जीएसटीचा परतावा आणि तपास यंत्रणांकडून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना दिला जात असलेला त्रास, मलिक यांचे वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरण अशा विविध प्रश्नांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी विरोधकांचा मुकाबला कसा करायचा यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. शिवाय अर्थसंकल्पातील विविध विकासकामांबाबत अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी आदींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांच्या सर्व प्रमुख मंत्र्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा या बैठकीला रामटेकवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही बैठक बुधवारी सायंकाळी ७ वाजता भुजबळांच्या रामटेक बंगल्यावर सुरु होईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami