जोधपूर – हत्या आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण प्रकरणात जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमात अन्य कैद्यांसोबत तुरुंगात मनसोक्त नाचले. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उच्च न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकृतीच्या कारणावरून जामीन देण्याची मागणी करणारे आसाराम बापू कीर्तनात नाचताना तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट दिसते.
पत्रकाराची हत्या आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ते सध्या जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. महाशिवरात्रीनिमित्त कारागृहात भजन-कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात जेलमधील कैदी सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत आसाराम बापू मनसोक्त नाचले. त्यांनी भजनही केले. यामुळे इतर कैदी मंत्रमुग्ध झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.